मनातील भावना...
मनातील भावना...
सांगावस तर खुप काही वाटते
तुला,
पण सांगु शकत नाही
मनातील भावना
मला व्यक्त करता येत नाही.!!
खरं म्हणजे राहत तर आहे
तुझ्याशिवाय,
पण राहु शकत नाही
मनातील भावना
मला व्यक्त करता येत नाही.!!
प्रयत्न तर नेहमीच असतो
माझा,
तुला आपलं बनवण्याचा पण,
तुला आपलं बनवु शकलो नाही
मनातील भावना
मला व्यक्त करता येत नाही.!!
हररोज पाहतो तुला स्वप्नात
कारण तुला विसरू शकत नाही
तुचं माझ पहिलं प्रेम
तुला हे सांगु शकत नाही
g>मनातील भावना मला व्यक्त करता येत नाही.!! घेऊन बसतो सागर आसवांचा एकांतात तु..होय तुचं होशील माझी या आशेने माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर हे तुला का? कळत नाही मनातील भावना मला व्यक्त करता येत नाही.!! वाटतं.. तु नेहमीच असावी नजरेसमोर पण समोर असतांनाही मन भरून तुला पाहु शकत नाही मनातील भावना मला व्यक्त करता येत नाही.!! ठरवलं तुला सांगायचं तर कदाचित तु बोलणार नाहीस भीतीने या मी तुला काही सांगत नाही मनातील भावना मला व्यक्त करता येत नाही.!!