STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

मनापासून हॅप्पी बर्थडे 'बापु'!

मनापासून हॅप्पी बर्थडे 'बापु'!

1 min
419

सत्य अन अहिंसेचा मूलमंत्र 

तुम्ही आम्हास दिला 

तरीही आम्ही जांगडगुत्ताच केला 

मनापासून हॅप्पी बर्थडे 'बापु'!...


मानवतेची साक्षात मूर्ती होता 

डोळे पाणावतात आजही....

तुम्ही नाहक बदनाम होता  

मनापासून हॅप्पी बर्थडे 'बापु'!...


आम्ही पुतळे उभारले ...

नोटांवर बसवले पण 

तुम्हाला फक्त कामापुरते वापरले 

मनापासून हॅप्पी बर्थडे 'बापु'!...


कुठून आणल होत हो ते धैर्य ....

अन ते अप्रतिम संघटन कौशल्य 

तुम्ही तितकेच प्रिय आम्हास ...

मनापासून हॅप्पी बर्थडे 'बापु'!...


तुमच्या अनुभवांची शिदोरी 

हवीहवीशी कधीच न संपणारी 

पुरून उरणारी , सदैव प्रेरणादायी 

मनापासून हॅप्पी बर्थडे 'बापु'!...


तुम्ही गेलात शरीराने पण ...

मना- मनात जिवंत आहात 

अन तुम्ही दाखवलेली सोनेरी पहाट

मनापासून हॅप्पी बर्थडे 'बापु'!...



Rate this content
Log in