STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

मनाच्या ह्या वाटेवरती

मनाच्या ह्या वाटेवरती

1 min
676


मनाच्या या वाटेवरती

मलाच मी शोधत होते

काय शोधत होते

तर चूक हे मी शोधत होते


सुख शोधताना

दुःख हे पाठलाग करी

मनावरच्या जखमा लपऊनी

सुख आहे साजर करी


नाते विणले मी

सुखाचे व दुःखाचे

बंधने लादली मनावर माझ्या

नात्यासाठी मन माझं हे झुरत आहे


हे सगळं बघताना

सांग रे मना मोकळा श्वास कुठे घेऊ

थकले रे मन माझे

सुखाची वाट मी किती बघू


आता कोणाची मिळेना

आधार कोणी देईना

प्रेम यांचे आटले आता

आनंद मनाचा शोधत आहे


Rate this content
Log in