STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

मनाच्या आकाशात

मनाच्या आकाशात

1 min
633


मनाच्या आकाशात

अश्रूंचे दाटी झाले

हे मना दे मोकळीक

वाहू दे त्यांना मुक्तपणे

भिजूनी डोळे माझे

निजली रात मी तशीच

ऊर भरूनी कंठ दाटला

कासावीस जीव माझा झाला

शेवटी काय आयुष्याला

दाखवायचे मला

दुःख माझे लपून मला

चेहऱ्यावर हास्य दाखवायचे आहे

पण मनातल्या घाव माझा

ताजा अजूनही आहे

समजुनी म्हणाला माझ्या

कशाची शिक्षा मी करते आहे?

डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली

मार्गी लावायचे मला हे ही

शेवटी अश्रु लपवुन मला

हास्य जगाला दाखवायचे आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन