मनाचं मला समजत नाही
मनाचं मला समजत नाही
1 min
492
मनावर झालेलं घाव
विसरता येत नाही
शेवटी कोणासाठी करायचे
माझाच मला कळतं नाही
दुःख माझ्या मनातले
किती मी आत दबायचे
शेवटी तेही ओसंडून
कधीतरी बाहेर पडायचे
मनाच्या माझा गुंता झाला
अश्रूंचा सोडवायचा प्रयत्न केला
ह्या आयुष्याचा कंटाळा आला
शेवटी काय हे सगळं कोणासाठी करायचे
सुखदुःखाचे चटके क्षणाक्षणाला मला मारायचे
आयुष्याच्या वर्तुळाभोवती हतबल मी झाले
कधी भरेल ही आयुष्याची पोकळी
वाट बघते मी ह्या क्षणभर सुखाची
