STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

मनाची श्रीमंती

मनाची श्रीमंती

1 min
312

अठराविश्वे दारिद्रय 

घरात भरलेले

हातातोंडाची गाठ

कठीणच असलेले   (1)


एक किरण सुखाचा

चिखलातील कमळ

किरणच्या हुशारीने

सोसायला मिळे बळ   (2)


पोटाला चिमटा घेऊन

मुलाला मोठे केले

त्याने डॉक्टर होऊन

दोघांचे पांग फेडले    (3)


गरीबी सरुन आता

सुखाचे दिवस आले

दोघांच्याही डोळ्यांत 

आनंदाश्रु दाटले     (4)


आवर्जून मुलगा सांगे

आई वडीलांची महती

गरीबीतून लाभली

मनाचीही श्रीमंती    (5)


Rate this content
Log in