मनाचा आवाज
मनाचा आवाज
1 min
11.7K
मनाचा आवाज मनातच
येत नाही तरीही ध्यानात
चारच शब्द बोलून बघा
सगळेच ठेवू नका मनात.
एकटं मन कोंडत असेल
बोलण्यासाठी झुरत बसेल
पाहून पाहून बंड करेल
जीव टांगणीला लागत नसेल?
बोलून बघा मोकळं वाटेल
त्यालाही कुणी आपलं भेटेल
एकटं नसल्याची खात्री पटेल
मनापासून..मनाची चिंता मिटेल.
