मन
मन
1 min
202
स्वप्न सुखाच्या सागरी
मन आनंदाने खुले
गंधाळली रातराणी
अंगणात छान फुले...१!
मन असते चंचल
धाव घेई चोहीकडे
कशी सावरू सावरू
वाटे अवघड गडे...२!
कधी दु:ख,कधी सुख
मन अथांग सागर
हृदयाच्या कोंदणात
माया, ममता आगर...३!
मन उडते आकाशी
उंच घेईल भरारी
वेळ येताच दाखवी
आहे नजर करारी...४!
मन देहातील पक्षी
जीव आहे तो उडेल
देह होताच निष्प्राण
धरा वरती पडेल...५!