STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

मन मराठीत बोल

मन मराठीत बोल

1 min
297

आई-बाबाच नाव आमच्या, मम्मी-डॅडी झालं।

राजभाषा दिन येत मन, भाषा मराठीची बोलं।।धृ।।


वर्षातून एकदाच येते आम्हा, भाषा मराठीची जण।

माय त्याच दिनी होते भाषा, पुन्हा नाही तीच आठवण।।

चीनी जपानी लोक, आपल्या राष्ट्र भाषेत बोलती।

तामिळी कानडी सुद्धा आता, री त्यांचीच ओढती।।

मराठी माणसाला कधी असं, असं वागणं जमलं।।।१।।


कुत्र्यांच्या छत्र्यावाणी झाल्या, इंग्रजीच्या शाळा।

अन मराठी शाळेत धाडीना, कोणी इथं मुला-बाळा।।

ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, तशी गाथा तुकोबाची।

तशी गोडी आहे का सांगा, भाषा इंग्रजीची।।

आपल्याच दारी मराठीला, भीक मागाया लावलं।।२।।


आषाढी कार्तिकेला जसे, नाव, ज्ञाना तुकयाचे घेती।

तसा शाळा, मंदिर, ऑफिसात, मोठा जागर घालती।।

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मोठा थाट।

तरी सापडेना का हो आमच्या, राज भाषा मराठीला वाट।।

 इंग्रजीच्या कौतुकाने मन आमचं, पाय चाटाया लागलं।।३।।


टी व्ही नाटक सिनेमात देती, इंग्रजीचा तडका।

भाषा प्रांत वाद करून इथं रोज, उडवीती भडका।।

पोटासाठी अन्न पाणी, इथं महाराष्ट्राचच खाती।

अन बोलण्यासाठी मराठीला, दुजा भाव देती।।

पोटी इंग्रजीच विष पण, ओठी मराठीच बोलं।।४।।


Rate this content
Log in