STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

मन मौजी...!

मन मौजी...!

1 min
448


मन मौजी...!

ऑथर ऑफ द इयर च

अप्रूप मला काही वाटलं नाही

काळ्या भेऱ्याच पितळ

उघड पडल्या वाचून राहील नाही


वाचक वर्ग मोठा पाहिला

त्यांच्या साठी उर मोकळा केला

कौतुक मनसोक्त होता लेखनाचे

वाटले देव भरून पावला

मतांचा जोगवा मागणे

नका नकोसे वाटले


जेंव्हा काव्य चोरीचे मध्येच

पितळ उघडे पडले

म्हंटले मनासी वाचक मायबाप

नको भलता डोक्यास ताप

नको म्हणाया कोणी टॉप

आहेत बरेच इथे अनेक बाप

मॅनेज होत आसेल काही तरी

तर आपण कशाला भाग घ्यायचा..?


विषाची परीक्षा घ्यायला

कश्याला घसा कोरडा करायचा...?

वाचणारे वाटले अडाणी सारे

वाहता डिजीटलचे सायबर वारे

मतदान करणे राहिले बाजूला

अज्ञानाचेच खरे तुटले अनेक तारे


नको बाबा तो पुरस्काराचा सोस

खोट्या मतदानाच्या जोरावर

त्या पेक्षा मनमौजी मी सदैव

विहारेन नभी बसून मोर पंखावर

आवकाशाला कवेत घेईन

ब्रह्मांडाला खिश्यात घालीन

वाचकांच्या अंतरात उतरीन

सदैव सुखाने हृदयी आनंदी राहीन


ऑथर ऑफ द इयर

हे दुसऱ्याच्या मतावर ठरणार

मग सांगा माझं म्हणून काय

या सुंदर जीवनात माझ्या उरणार..?

कविता माझी ज्यांनी वाचली

ती सर्व मतं मला मिळाली

ऑथर ऑफ द इयर ची

हौस माझी पहाता पहाता क्षणात भागली


वाटते आभार वाचकांचे मानावे

भाव मनीचा सर्वांना सांगावे

नित्य विचार आपले मांडावे

सदैव आपल्या सानिध्यात रमावे

नवं वर्षाची भेट ही मला

आपल्या वाचनाने छान मिळाली

त्या गत वर्षाला निरोप देताना

तपस्या माझी फळास आली....!


Rate this content
Log in