मन मौजी पाऊस
मन मौजी पाऊस

1 min

69
अरे अरे पावसा
तू असा रे कसा
कधी येतोस अचानक
कधी मारतो दडी
भित्रा ससा जसा
अरे अरे पावसा
किती रे तू हट्टी
कधी करतोस कट्टी
कधी देतोस बट्टी
तिथे सारेजण तळमळतात
वाट पाहतात तुझ्यासाठी
अरे अरे पावसा
तुला गुरुजींनी शिकवली
का नाही शिस्त
कधी येऊन कधी न येऊन
सर्वांनाच करतोस त्रस्त
तर कधी अतिवृष्टीने
सारेच करतो उध्वस्त
उशिरा येतोस म्हणून कधी
गुरुजी ओढले नाही
का तुझे कान
दांडी मारतोस म्हणून
केला नाही का घोडा छान
तू आपल्याच मस्तीत छान