STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

3  

Asmita prashant Pushpanjali

Others

मन माझे

मन माझे

1 min
496


शब्दांचे बंधन नको माझ्या भावनांना।

शब्दांची मर्यादाही नको माझ्या भावनांना।

मुक्त उडू दे गगनात माझ्या कल्पनांना।

घेवू दे शब्दात झेप माझ्या कल्पनांना।

हलक्या असाव्या कापसापरी माझ्या वेदना।

वाहून जावू देत, आनंदाश्रूत माझ्या वेदना।

आशेच्या पंखाच्या बळावर उडती माझे स्वप्न।

निद्रेपार दोन डोळ्यात मावन नाही माझे स्वप्न।

भावना, कल्पना, वेदना, स्वप्नात वसती मन माझे।

रुणझुण गित गाऊनी डोलूदे अंबरी मन माझे।


Rate this content
Log in