मला तुझ्या मनात घर करू दे
मला तुझ्या मनात घर करू दे
मला तुझ्या मनात घर करू दे
मला तुझ्या अश्रूंना वाट मोकळी करू दे
मला तुझ्या प्रत्येक शब्दाला जागु दे
मला तुझी साथ मिळत राहू दे......!
मला तुझ्या होणाऱ्या स्वप्नांना पूर्ण करू दे
मला तुझ्या नावाची चर्चा माझ्या भोवती गुणगुणत
असू दे.....
मला तुझ्या आठवणीत कायम हसत मुख राहूदे
मला तुझ्या घरात एक नातं बनू दे.....
मला तुझ्या मनांत असणाऱ्या भावना ओळखु दे
मला तुझ्या आनंदाचे क्षण अजमावू दे
मला तुझ्या गप्पा मारत असताना तुझ्या बाहुपाशात
रंग भरू दे.....!
मला तुझ्या सोबत फिरायला येऊ दे
मला तुझ्या डोळ्यात साठवून प्रत्येक नजर माझ्या वर असु दे
मला शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सहवासात असू दे......
