मला गावावाचून करमेना
मला गावावाचून करमेना
नोकरीसाठी आलो गड्या
गाव सोडूनी शहराला
मला गावावाचून करमेना
गड्या आपला गाव बरा!! (1)
हिरव्या कुरणातली पायवाट
मोकळा वारा वाहे भन्नाट
स्वच्छ मोकळी हवा अन्
माय दाराशी पाही वाट (2)
जागा पाणी सारे टीचभर
घड्याळ धावे इथे भराभर
कुणी न बोले कुणाशीच
माणुसकी न इथे पेरभर (3)
इथे शेजारीही परका
ना कुणाचा कुणास पत्ता
शिळोप्याच्या इथे न गप्पा
इथे न वडाखालचा कट्टा (4)
काय करावे कोठे जावे नुमजे
टी. व्ही. वाचन किती करावे!!
आठवणींच्या लडी उलगडणे
चरितार्थासाठी आले रहाणे (5)
स्वच्छ मोकळी निरोगी हवा
मनोव्यापारही खुल्लमखुल्ला
नाती मैत्रीचा गोफ गुंफला
कधी येईन ध्यास मनाला (6)
