मज विज्ञान भेटले
मज विज्ञान भेटले
1 min
613
जेव्हा मज विज्ञान भेटले
नवज्ञानाचे मी शिखर गाठले
वाटे मज अप्रूप सारे
प्रयोगशीलतेचे नवे वारे
नवनिर्मितीचा आनंद भारी
सोबत घेवू ऊंच भरारी
नवे शोध वाढवती ज्ञान
नव्या उपायांची होते जान
ज्ञानात पडते अविरत भर
पावलोपावली उभारू नवे स्तर
विचारांची वाढवून गोडी
नवकल्पनांची रास जोडी
विज्ञानावर जडले प्रेम
आधुनिकतेचा नवा गेम
