STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

मित्र

मित्र

1 min
14.1K


मोकळ्या अफाट दुनियेत या

माणसाचा वावर सुरु होता

रोज वेगळा माणूस भेटतो

त्यातुनच मित्र भेटू लागतो..


आधाराचे हातही मित्र देतो

धक्क्यातून सावरून हा घेतो

पाठीवर हात फिरवून मित्र

वाहणाऱ्या अश्रूंना थांबवतो..


विश्वासाचे असते मैत्री नाते

पैश्याच्या आमिषाला ना भुलते

प्रेमाचे नाणे व्यवहारी चाले

चव्हाट्यावर कधीही ना बोले ..


मैत्रीचा लाभ मित्रामुळे होतो

जीवनास सूर नवा लाभतो

वेगवेगळ्या मित्रांच्या रूपात

आपल्याला कृष्णसखा भेटतो..


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ