STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

"मित्र" हवा

"मित्र" हवा

1 min
2.7K


संकटाच्या वेळी
धावून येणारा,
मनातल्या भावना
जाणून घेणारा,
स्वतः पडत्या बाजूला
असून सुद्धा
माझ्या दुःखात
सुख शोधणारा
"मित्र" हवा

माझ्या यशामध्ये
स्वतःच यश पाहणारा,
चुकलेल्या गोष्टी
मला समजवणारा,
रागावून सुद्धा
माझ्याशी बोलणारा
"मित्र" हवा

दुःखाचे अश्रू
जागेपणी झेलणारा,
माझ्या आयुष्यात
रंगून खेळणारा,
चेष्टा मस्करी करून
मलाच हसवणारा
"मित्र" हवा

आयुष्याचे धागेदोरे
सांभाळून,
माझ्या शेवट क्षणी
माझे डोळे बंद
करून
माझी आठवण करणारा
"मित्र" हवा

-नागेश(ndd)


Rate this content
Log in