मीच माझा रक्षक (अभंग रचना)
मीच माझा रक्षक (अभंग रचना)
1 min
11.7K
कोरोना लादला I ते लॉकडाऊन I
घरात कोंडून | घ्यावे सदा ॥ १ ॥
तोंडाला रुमाल I सदाच बांधिन I
अंतर राखीन I सुरक्षित ॥ २ ॥
हात दोन्ही धुता | वीस सेकंदात |
मगच घरात I शिरावया ॥ ३ ॥
डोळा नाक कान I स्पर्श ना उगाच |
येतो संयमच | कामी आता ॥ ४ ॥
मीच माझा आता I रक्षक होणार |
आणि हारणार | हा कोरोना ॥ ५ ॥