मी
मी
1 min
140
माझ्यातला मी जोपर्यंत मरत नाही
तोपर्यंत मी माणूस ठरत नाही
मी म्हणजे मस्ती
कायमची धास्ती
मी पणाची नकोच
देहात या वस्ती
मी पणाची दुरी भरत नाही
मी पणात पत उरत नाही
मी पणाची मैत्री
सर्व सुखाला कात्री
मी पणात नाही
आयुष्याची खात्री
मी पणात ममत्व ठरत नाही
मी पणात माणूस तरत नाही
मी म्हणजे मानभंग
सर्व विनाशी सुरुंग
मी म्हणजे नशेची भांग
मी पणाचा नकोच संग
जेथे मी नाही तेथे सर्वकाही
साधू-संतात मी पणा दिसत नाही
