STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

3  

SHUBHAM KESARKAR

Others

मी वृक्ष बोलत आहे.....!!

मी वृक्ष बोलत आहे.....!!

1 min
11.6K

जोडुनी ही नाळ भूमीशी

वर्षानुवर्षे वाढत आहे

एकाच जागी राहून

प्रत्येकास पाहत आहे !! धृ !!


येणे जाणे माणसाचे

पाहता हृदय भरत नाही

किलबिलाट मुलांची ऐकता

दिवस हा मावळत नाही !! १ !!


कामा पुरती गरज माझी

हे सर्व जाणून आहे

काम होताच तत्परतेने

कापणे तुमच्या हातात आहे !! २ !!


अस्तित्व हिरवू नका

आमचे ही जगणे मोलाचे आहे

पृथ्वीचे सौंदर्य जपण्यास

हरितपणा निसर्गाचे देणे आहे !! ३ !!


निसर्गा पेक्षा मोठे तुम्ही

कधीपासून होऊ पाहत

कृतघ्नाचे स्पष्ट उदाहरण

तुमच्यातच दिसत आहे !! ४ !!


सुविधा तुम्हाला हव्यात

कामही तुमचे आहे

मोल तुम्हाला मिळणार पण

उध्वस्त आमचे जीवन आहे 

विचार करा तुम्ही आता 

क्रूरभावनेने वागू नका

एकत्र जगू ह्या पृथ्वीवरी

आनंद द्विगुणी करूया !! ५ !!

आनंद द्विगुणी करूया !!


Rate this content
Log in