मी तृतीयांशी
मी तृतीयांशी
1 min
1K
नपुंसक म्हणोनी मिरवणूक माझी तृतीया मधे का निवडणूक माझी
परत जन्म घेईन होईन कन्या पुरुष जन्मलो ही नसे चूक माझी
शरीर पुरुषाचे मनी आत बाई अशी का चुकीची घडवणूक माझी?
मनीच्या व्यथांच्यावरी हास्य होई जगी रोज होते छळवणूक माझी
मनुष्यारुपाचा असूनी दिसोनी चराच्या परी का चिडवणूक माझी?
भिमाने दिलेत मज हक्क संविधानी समानूभुतीशी चुकामूक माझी
