मी सध्या काय करतेय
मी सध्या काय करतेय
कोरोनाने दिलीय ही शिक्षा
करते खूप सारे मी घरकाम
मोलकरीण बसलीय घरात
त्यातूनी थोडासाच आराम
वाचन करतेय अधून-मधून
लागलाय त्याचा तर ध्यास
लेखणही करते बरेच काही
हा तर माझा बनलाय श्वास
साफ-सफाई करते सदाची
आले विषाणूचे संकट भारी
करून योग, व्यायाम घरीच
चाललीय प्राणायामाची वारी
दिवस आलेत हे दारिद्र्याचे
कसे पुरवावे जिभेचे चोचले
दुकाने न् बाजार सारेच बंद
हे पदर कामासाठी खोचले
कधी होईल सुटका यातूनी
कोणाला सांगता येत नाही
घरातच झालो सारे बंदिवान
रेसिपी छानच बनवते काही
थोड्या शिळोप्याच्या गप्पा
अंताक्षरी नि पत्तेही खेळणे
आप्तजनांशी बोलू फोनवर
खुशाली सर्वांची ती कळणे
