मी पाहिलेला चंद्र
मी पाहिलेला चंद्र
1 min
2.7K
शीतल छाया तुझी मनोहर
धूम्रवर्ण तेज सुखकर
पोर्णिमेचे तेज अपरंपार
सहस्त्र चांदण्यात एक चन्द्र निरंतर
तुझ्यात गवसतो मार्ग माझा
किर्रर्र रात्री प्रकाशाचा राजा
अमावस्येचे रूप रौद्र
अन पोर्णिमेचे तेज उत्कट
मार्ग दाखवीत नेई ध्रुवाच्या वाटेवर
चांदण्यात एक चन्द्र निरंतर
