मी एक स्त्री
मी एक स्त्री
1 min
179
ममतेचा सागर मी
परोपकारी वृत्ती माझ्यात
नात्यातील गोडवा चाखते
आहे मी आईच्या रूपात
अर्धांगिनी शिवाची
लाभले देदिप्यमान रूप
सजूनधजून उठून दिसते
दैवी गुण माझ्यामध्ये खूप
उत्तुंग भरारी माझी
उडवते झोप भल्याभल्यांची
अधिकारी पदाधिकारी पदे भूषवून
मने जिंकली सकल जणांची
मी एक स्त्री
याचा मला अभिमान
8 मार्चच नको
नित करा माझा सन्मान
