महत्व
महत्व
1 min
227
जातो मोकळा वेळ कित्येकदा, कळतही नाई.
नेमकं मोक्याच्या वक्ताला, मंग लागते मागे घाई.
महत्व वेळेला कायमच असते, कळते पण ते फक्त वेळ आल्यावरच.
नाई तर काम नसताना, मोकळा वेळ गेलेला कळत नाही खरच.
काहीही घडतं अस समोर, होत्याच नव्हतं होत.
कुणी बोलतं खरं खरं, तर कुणी बोलतं खोटं.
कुणी करतं आराम, तर कोणी पळतं तयारीसाठी.
कुणी जगतं रुबाबात, तर कुणी लपतं उधारीसाठी.
वेळ पाळल्याशिवाय, ओळख नाही कर्तृत्व.
वेळ आली की वेळच सांगते, वेळेचं महत्व.
