STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Others

2  

Ashok Shivram Veer

Others

म्हणते ती

म्हणते ती

1 min
71

म्हणते ती माझ्यावर कविता कधी केलीच नाही,

चार चांगल्या शब्दांनी शाब्बासकी कधी दिलीच नाही.

चार सोडा दोन शब्दही लिहिण्याची तसदी कधी घेतलीच नाही,

शब्दांविना खूष करण्याची संधी मात्र कधी सोडलीच नाही.

मुद्दामच एकदा रचली बिनधास्त कविता तिच्यावर,

वाचून ती उमटली खळी तिच्या गालावर.

अवघड शब्दांचे अर्थ कधी तिला कळलेच नाहीत,

मनीचे भाव आमच्या कधी जुळलेच नाहीत.

दुरावा हा भोवताली कधी घोंगावलाच नाही,

जीवनामध्ये एकमेकांचा अडसर कधी झालाच नाही.

तिच्यावर कविता केली नाही म्हणून काय झाले,

जीवन तर सुख आणि समृद्धीने बहरुन गेले...


Rate this content
Log in