STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

4  

Sunita Anabhule

Others

म्हणी गुंफण काव्य

म्हणी गुंफण काव्य

1 min
435

नाचता येईना अंगण वाकडे,

अंगात गुणांचे सदा वावडे,

विचारांचे म्हणाल तर बुद्धीत तोकडे,

पण वीतभर चुलीत हातभर लाकडे,।।१।।


पेरले ते उगवते, यावर जग चालते,

सत्कर्म केले तरच पुण्य मिळते,

कळते पण वळत नाही* म्हणते पण,

दिसते तसे नसते म्हणून जग फसते।।२।।


घरोघरी असतात मातीच्या चुली,

तरीही शिक्षणाच्या बाबतीत मागेच मुली,

म्हणायचे फक्त मुलगी शिकली, प्रगती झाली,

कितीही शिकली तरी रुढीत बांधलेली ।। ३।।


गर्वाचे घर खालीच असते,

अतिरेक मातीमोल हेच सांगते,

स्वकर्तुत्वाने योग्य निर्णय स्वतः घेते,

ती व्यक्ती ऐकून जनाचे, करते मनाचे।।४ ।।


प्रेमाची अक्षरे समूहात नवे नवे शिकतो,

कधी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो

तेव्हा कान पकडून ताईदादा,

चुका सुधारतो,

मग आम्ही गोगलगाय नी पोटात पाय असा होतो।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन