महिला दिन
महिला दिन
1 min
483
वर्षातला एकच दिवस होतो,
साजरा जागतिक महिलादिन,
मग वर्षभर आम्ही मोकळे,
स्त्रियांना करण्या हीनदीन ।।
नको विजयाची माळ,
नको मला सत्कार
फक्त एक माणूस म्हणून,
हवा जगण्याचा अधिकार ।।
आई-आजी,भार्या,भगिनी,लेक,
निभावते साऱ्या भूमिका ठोक,
इतरांसाठी सर्वस्व पणाला देत,
त्यांच्या सुखासाठी जगण्याचा रोख ।।
मुलगाच पाहिजे अट्टाहास करी,
तेव्हा स्त्रीच स्त्रीची होतेय वैरी,
गर्भातच उमलत्या कळीला मारी,
निसर्ग असमतोलास कारण ठरी ।।
आतातरी माणसा जागा हो,
झाडांसोबत मुलगी वाचव,
भविष्य वाचवण्या स्वतःचे,
घराघरांत स्त्री अंकुर जगव ।।
