महापुरातली माय
महापुरातली माय
1 min
14.4K
भुकेल्या महापुरानं
घरटं खाऊन टाकलं
वाट तुझी पाहताती
घरट्या मधली रे पिलं ---- || १ ||
आणे पिलांसाठी चारा
किती टाहो फोडलास
डोळ्या समोर पुरानं
केला कसा एक घास ----- ||२ ||
तुझ्या पायाखालची रे
कसी जमीन फाटली
डोईवरच आभाळ
माता गिळ्या उठली ---- || ३||
सपनांच्या सुईतून
घातलेले टाके सारे
आपोआप उचकती
उसळत्या महापुरे ----- || ४ ||
घर गाठता गाठता
आले दारत मरणं
पाऊस झेलता झेलता
पक्षी आभाळी मरणं ---- || ५ ||
हुज्जत घाले पावसाशी
काय घडला रे गुन्हा
काही सांग नारे बाप्पा
का आटतो हा पान्हा ----- || ६ ||