महापराक्रमी संभाजी महाराज
महापराक्रमी संभाजी महाराज
महापराक्रमी छत्रपती
संभाजी छावा महाराज
होते सवाई शिवाजी
धर्मवीर त्यांची गरज आज
अन्यायाला थारा नव्हता
नव्हती हुकुमशाहि तेव्हा
थरथर कापत गनिमी
मोगल नजर वाकडी जेव्हा
धगधगत्या ज्वाला होत्या
डोळ्याचं सदैव त्यांच्या
मराठ्यांचे आन-बान
शान कारणाने ज्यांच्या
शेतकरी आयाबहिणी
होते सुरक्षित राज्यात
वाईट हेतू वाल्यांना
दाखवत टकमक टोकात
स्वतःमध्ये एक कवी
होते महाराज विद्वत्ता
त्यांची संस्कृती ग्रंथ
बुद्धभूषण कळते पहातां
गनिमी क्रिया दुवा
करत अल्ला यांना
धर्मवीर म्हणून त्यांचा
थकत ना गौरव करताना
मरण जरी पत्करले मराठी
अस्मिता टिकवण्या
त्यांच्यासारखा राजा
पुन्हा जन्मे ना जगवण्या.
