महामानव
महामानव
भुकेल्यांस देतो अन्न , दुर्बलांस धीर
आंधळ्याची काठी होतो , तोच खरा थोर
जीवनात ध्येय त्याचे , सेवाभाव हेच
संकटात धाव घेई , पांडुरंग तोच
स्वार्थाचा ना लवलेश , नसे गाजावाजा
दुखल्याखुपल्यांसाठी , दिलदार राजा
सर्वजण समानच , नाही भेदभाव
सर्वांसाठी नित्य धावे , मनी बंधुभाव
नाव ना कुठे छापतो , नसे प्रसिद्धीत
चित्रगुप्त करी नोंद , तयाच्या खात्यात
देई आशिर्वच दुवे , सर्वच तयासी
निरपेक्ष सेवा हीच , आवड तयाची
सार्थक मनू जन्माचे , सेवेने साधतो
कर्म हीच पूजा माने , निगर्वी रहातो
नाही सेवेची मोजणी , पुण्य औक्षोहिणी
कर्मण्येवाधिकारस्ते , सदैव मानसी
अशा महामानवाला , कोटी नमस्कार
सार्थकच जीवनाचे , कृतीने साकार
