मेरूमणी
मेरूमणी
सह्याद्रीच्या कडेकपारी
सिंहगर्जनेचा नाद गुजला ;
अफाट बुद्धिचातुर्य- प्रतिभा
घेऊन " मेरूमणी " जन्मला .
राजमाता जिजाऊंनी
स्वातंत्र्यमार्ग दाखवला ;
रायरेश्वरी शिवस्वराज्याचा
शपथेने विडा उचलला .
हर हर महादेवाचा गजर
सह्याद्रीच्या कडेकपारी घुमला ;
एकेक शिवमावळा शंभर
गनिमांना भारी पडला .
खानाचा कोथळा काढून
प्रतापगडी केले दफन ;
स्वराज्य गद्दाऱ्यांसाठी
तयार असे कफन .
हयातभर जीवाशी खेळून
छत्रपती शिवराय जगले ;
शिवपराक्रमाने दिल्लीचे
बादशाही तख्तही डगमगले .
करारी -भेदक नजर
रक्तातून वाहे लाल लाव्हा ;
मावळांतील प्रत्येकां वाटे
व्हावे लढाऊ शिवछावा
"शिवाजी महाराज की जय"
शिवघोष असे मुखी ;
सुगीच्या शिवकाळात
रयत होती सुखी .
