STORYMIRROR

Ashwini Kulkarni

Romance

3  

Ashwini Kulkarni

Romance

मधुचंद्र रात्र

मधुचंद्र रात्र

1 min
12.3K

ती मधुचंद्र रात..... माझ्या हाती तुझा हात, 

ती मधुचंद्र रात...... पौर्णिमेचा चंद्र त्यात मंद प्रकाश, 

 

ती मधुचंद्र रात...... माझ्या गालावरील खळी त्याच्या प्रेमात पडलेला तू आज, 

ती मधुचंद्र रात..... लहानपणापासून पाहिलेल्या लग्नरुपी सागराची सुरुवात, 

 

ती मधुचंद्र रात..... तू

आयुष्यभर साथ देशील  

हे वचन फक्त त्यात, 

ती मधुचंद्र रात..... तुझा पहिला स्पर्श आणि नात्याची सुरुवात, 

 

ती मधुचंद्र रात..... स्त्रीजन्माची पूर्णता आज त्यात, 

ती मधुचंद्र रात...... तुझ्या मिठीत सामावून घ्यावे 

मला अलगद आज,, 

 

ती मधुचंद्र रात..... चैत्रातील पालवी जणू आज, 

ती मधुचंद्र रात्..... नेहमी राहील स्मरणात, नेहमीच राहील स्मरणात.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance