मैत्रीणी ( कविता )
मैत्रीणी ( कविता )
1 min
431
आम्ही तिघी मैत्रीणी
खेळायला जेंव्हा येतो
सगळ्यांची अशी
गंमत ती करतो....१
अभ्यासही करतो
खेळही खेळतो
इकडे तिकडे
असे बागडतो...२
मोठे रागवतात तर
सॉरी त्यांना म्हणतो
त्यांच्या दारातून मग
पळत असे सुटतो....३
गल्ली बोळातून त्या
खेळ आमचा रंगतो
खेळून झाल्यावर
चेहरा कसा फुलतो....४
अशी आमची जोडी
मोहल्ला गाजवतो
छोटे मोठे काम ऐकत
आनंद तो पसरवतो....५
