STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

3  

Sunita Anabhule

Others

मैत्री

मैत्री

1 min
201

ना रक्ताचे, ना नात्याचे,

हे बंध रेशमाचे,

ना गरिबीचे, ना श्रीमंतीचे,

हे रंग समतेचे,

या धरतीवर सदैव राहो,

बंधन प्रेमाचे।।


संकटकाळी धावून येती,

मदतीचा हात ही देती,

नसे अपेक्षा परतीची,

दोस्तीच्या नात्याला देवू,

नाव अतूट प्रेमाचे,

या धरतीवर......


बालपणीच्या जमाडी जमती,

तारुण्यातील गुलाबी गमती

वृद्धत्वाची गुपिते जपती

आज ही सारे निभावती,

चिरंजीव प्रेमाला ना,

लागो दृष्ट कोणाची,

या धरतीवर...


प्रेमात पडता सहाय्य करती,

भल्या बुऱ्याची जाणीव देती,

दुबळ्यांचा आधार होती

असेच मैत्र सदैव राहो

ही इच्छा मनीची।।

या धरतीवर .......


Rate this content
Log in