मैत्री
मैत्री
1 min
180
मैत्री म्हणजे निखळ निर्झर
भाव मैत्रीचे झरती झरझर
मैत्री म्हणजे शरदाचे चांदणे
मैत्रीमधे काहीच ना उणे
मैत्री म्हणजे कोकिळेचे कूजन
मधुर भाषेचे असे अभिवचन
मैत्री म्हणजे शांत जलाशय
असे योग्य सल्ल्यामधे आशय
मैत्री म्हणजे दर्या खवळणारा
वेळप्रसंगी गाज सुनवणारा
मैत्री कधीच देत नाही धोका
आणीबाणीचा येवो प्रसंग बाका
मैत्रीचा रेशमी धाग्यांचा गोफ
घट्ट विणीमुळे सुख मिळे मोप
