मायबोलीची महती पटवून देताना
मायबोलीची महती पटवून देताना
जगाच्या शर्यतीत टिकता यावं या भीतीने माणूस इंग्रजी कडे वळू लागला..
इंग्रजीला प्राधान्य देता देता आपल्या मायबोलीला विसरू लागला..
धड चार शब्दही न बोलता येणाऱ्या लहान मुलांना इंग्रजी शाळेत पाठवू लागला..
अन् मायबोलीचे शिक्षण देणे मात्र विसरून गेला...
सांगा पाहु कसा होणार त्या मातीच्या गोळयाचा विकास...
ज्याला धड मायबोली अवगत नाही चालला तो इंग्रजी शिकायास..
नुसत्या बाह्य दिखाव्यासाठी दिवस रात्र धडपड करतात माय बाप..
इंग्रजी माध्यमात मुलगा शिकावा म्हणून सहन करतात सूर्याचा ताप..
कोण सांगेल त्यांना शिकवा निदान चार वर्ग आपल्या मुलांना मायबोलीत...
मग इंग्रजीला ही मागे टाकण्याची शक्ती आहे आपल्या मायबोलीत..
नुसतं जगासाठी म्हणून मुलांना इंग्रजी शाळेत पाठवू नका..
मायबोली आल्याशिवाय इंग्रजी आहे धोका..
आजच्या काळाची गरज असली जरी इंग्रजी भाषा ...
तरी मायबोलीला आपण विसरून जावे अशी नसावी कुणा आशा..
गोडवा आहे जेवढा आपल्या मराठी भाषेत..
नाही हो तेवढा कोणत्या दुसऱ्या भाषेत..
आपणच आपल्या मायबोलीचा करावा आदर ..
नाही तर इंग्रजीला प्राधान्य द्यायला सगळेच आहेत सादर..
