माया ( सहाक्षरी )
माया ( सहाक्षरी )
1 min
12.1K
आई बाबा माया
लहान लेकरा
घरात आनंद
क्षण ना दुसरा
लहान पावले
स्पर्श तो सानुला
मूर्त रूप हेच
दोघांच्या प्रेमाला
काळजी दोघांना
नव्या लेकराची
तळहाती जीव
देखरेख त्याची
हृदय प्रेम फुले
लेकरा पाहता
कुटुंब पुर्णत्व
तान्हुला तो येता