माय मराठी
माय मराठी
1 min
337
पहिली माझी ओवी गं
माझ्या माय मराठीला
लेकरे आम्ही हिची
जपते आम्हाला सदा||१||
दुसरी माझी ओवी गं
माझ्या मायबोलीला
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यांतील शिळा||२||
तिसरी माझी ओवी गं
माझ्या मराठी भाषेला
घडविले साहित्य
जगासाठी||३||
चौथी माझी ओवी गं
ह्या रणरागिणीला
जन्म दिला हिने
शूरवीरांना||४||
पाचवी माझी ओवी गं
सकल जनतेला
हिला जपा जीवापाड
आहे अभिमान||५||
