STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3.8  

Shila Ambhure

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
978



राजभाषा म्हणोनिया

करिती सारे सन्मान

मायबोली मराठीचे

गातो आम्ही जयगान।।धृ।।


बोलतो आम्ही मराठी

तिचा आम्हा अभिमान

गौरवाची परम्परा

ती महाराष्ट्राची शान ।।1।।


मराठी भाषा रांगडी

साहित्याची असे खाण

प्रकार असो कोणता

नाहीच शब्दांची वाण।।2।।


जात्यावर ओव्या गाते

बहिणाई गोड छान

ज्ञानदेवाने रचिले

हे बघा पसायदान।।3।।


प्रगतीचे पंख जरी

देते आम्हासी विज्ञान

झेप घेतली आकाशी

राखून मातीचे भान।।4।।


भाषेचे पाईक आम्ही

लावू पणाला हो प्राण

फडकत ठेऊ झेंडा

करूनी जीवाचे रान।।5।।


Rate this content
Log in