माय आमुची मराठी
माय आमुची मराठी
1 min
246
रक्त आमुचे सळसळते
तुझ्यासाठी कळवळते
तुझ्या शब्दांतील मायेने
ह्रदय आमुचे गहीवरते
भाग्यवान आम्ही इथले
माय आमुची मराठी
तिच्या कुशीत जन्मलो
पुण्यवान आम्ही मराठी
धार लेखणीस आमच्या
आम्ही लिहीतो मराठी
शब्द असती परखड
आम्ही बोलतो मराठी
