मावळता सूर्य
मावळता सूर्य

1 min

13K
उगवता सूर्य जसा
नवी प्रेरणा देतो जीवनाला
तसाच मावळता सूर्यही
काहीतरी शिकवून जातो....
"थांबा, थोडी विश्रांती घ्या"
आपल्या कार्याचे मूल्यांकन करा...
शरीर आणि बुद्धीला आराम द्या
झालेल्या चुका दुरुस्त करा व
नव्या दमाने, नव्या जोमाने
परत प्रवास करा "उद्याचा"
मे घेऊन येईल रथ "तेजाचा"
नव्या उत्साहाने
नवी "पहाट" घेऊन....