मारेकरी??
मारेकरी??
तासनतास मोबाईल हाती घेऊन
लिहिण्याचे प्रयत्न करत असतांना
कित्येक शब्द जन्म घेतात
आणि क्षणातच मारले जातात
त्या निष्पाप शब्दांचा मारेकरी
म्हणून वावरतांना मलाच लाज वाटते
पण खरा मारेकरी असतो वेगळा
आणि त्यावर कुणी शंकाही घेत नाही
कारण तो कुणाला दिसत नसतो
आणि मानत नसतो तोही गुन्हा त्याचा
म्हणून नेहमी फसत असतो
माझ्यासारखा बेकसुर साहित्यिक
चार ओळी लिहाव्या म्हणून
साठवावे लागतात कित्येक शब्द
आणि त्यासाठी शब्दांच्या बागेत जाऊन
वेचावे लागतात शब्द आवडीचे
आणि करावी लागते तडजोड
एखाद्या विषयावर शब्दांना मांडण्याची
शब्दांचा पसारा मांडून
जेव्हा साहित्यिक लिहायला बसतो
तेव्हा छळत असतो मारेकरी
त्याच्या विषयामध्ये हस्तक्षेप करून
आणि मग होते कत्तल त्या शब्दांची
एकही विषय न भेटल्याने