STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

मान्य नाही मला

मान्य नाही मला

1 min
650

मान्य नाही मला 

नेहमी स्त्री म्हणून तिला 

चेष्टेचा विषय बनवणं 

तिच्या मागे तिच्या पूढे 

सार्यांनी तिला हिनवणं.

मान्य नाही मला मान्य नाही मला 

तिचा आवाज नेहमी 

चार भिंतीत दाबणं

तिच्या बरोबर नेहमी 

बेअदबीने वागणं

मान्य नाही मला मान्य नाही मला 

तिचा मनाला लागेल असे 

नेहमी टोचून बोलणं

सार्यांसमोर तिच्या सोबत 

अपमानास्पद वागणं.

मान्य नाही मला मान्य नाही मला 


Rate this content
Log in