मानवी मन
मानवी मन

1 min

382
मन बावरे मानवी
कधी इथे तर तिथे
कशी सावरु मनास
उंच उंच नभी उडे (1)
कधी आनंदी प्रसन्न
जग सुंदर भासते
काव्य नकळत कसे
पानावरी उतरते (2)
कधी दुःखी नि उदास
संवेदना मूढ होई
मन बावरे अदृश्य
मज चेतनाच देई (3)
मन वढाय वढाय
कवयित्री बहिणाई
कधी कसे कुठे उडे
सांगणेच जड जाई (4)
मन ठेवावे काबूत
जरी बावरे असते
अभ्यासाने साध्य होय
एकाग्रता लागतसे (5)