माणूसकी
माणूसकी
1 min
197
माणसातली माणूसकी
सदैव जागी राहू द्या
आनंद वाटा दिलखुलास
सदैव आनंदी राहू या
नका वागू पशू सारखे
हिंस्र आणि नियमबाह्य
जागे ठेवा मनाला सदा
करा इतरांना सहाय्य
अन्याय सहन करू नका
वाचा जरूर फोडा
गुदमरलेल्या जिवाची
कोंडी अवश्य फोडा
आदर्श जिवन जगायचा
प्रयत्न नेहमी करावा
समाधानी जगताना
सारा काळ सरावा
