माणुसकीचा ताईत
माणुसकीचा ताईत

1 min

11.6K
आज गरज आहे काळीज चिरून माणुसकीचा ताईत भरण्याची|
ताईत म्हणजे अंधविश्वास नव्हे हि धडपड आहे जगण्याची||
माणुसकी विसरून गर्विष्ठ आत्मा,भुक्या अत्म्यालाही विसरला आहे|
गरिब असो श्रीमंत माणुसकी विमा फिका आहे||
माणुसकीच्या हृदयात गाभारा केव्हा बनेल|
माणसा-माणसातला खरा देव मंदिरात केव्हा दिसेल||
माणसाचा खरा धर्म माणुसकी, ती जन्मापासून असते|
रक्तात मिसळते ती जात, ती मरेपर्यंत टिकते||
धर्म पंथ जात एक पुन्हा माणुसकीची गरज आहे आता|
विश्वाचे अनेक धर्म श्रेष्ठ माणुसकीचा मंत्र जपता तो बनेल खरा भाग्यविधाता||