STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

मामाचा गाव

मामाचा गाव

1 min
743




नदीच्या पल्याड

आहे एक गाव.

जांभळाची वाडी

असे त्याचे नाव.


खुप खुप छान

ती मामाची वाडी

तिथे आहे मोठी

शानदार गढी.


वडाच्या पारंब्या

झोपाळे झाडाला

दगडांचा मार

आंब्याच्या पाडाला.


मामाच्या गावात

ओढा आणि नदी

शेतातून जाते

एक छोटी पांदी.


मामाचा गाव हा

स्वच्छ छान छान

हागणदारीमुक्त

मिळविला मान.


मामाच्या वाडीत

घाण नाही कुठे

रंगीत रांगोळी

हर दारापुढे.


झाडांची सावली

अंगणात दारी

शौचालय आहे

प्रत्येकाच्या घरी.


महती गावाची

सांगू तरी किती!

होत नाही तिथे

ओंजळ हं रीती.


साहित्याला गुण द्या
लॉग इन