माझ्याबद्दल काहीतरी
माझ्याबद्दल काहीतरी
1 min
33
ती फुलासोबत बोलत होती,
माझ्याबद्दल काही तरी,
सांगत होती मनातले तिच्या,
माझ्याबद्दल काहीतरी.....
गोड हसू सांडत होते तिचे,
त्या गुलाबी पाकळ्यावर,
गुज गुपीत होते खरे,
माझ्या बद्दल काहीतरी.....
पाहणे तिचे लाजून आरशातले,
दाबने ओठ तिचे स्पर्शातले,
ती पाहते डोळ्यात तिचीया,
माझ्याबद्दल काहीतरी.....
