STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Others

3  

Ganesh G Shivlad

Others

माझ्या मनात

माझ्या मनात

1 min
195

नेहमीसारखा दिवस संपवून..

रात्री काल बसलो होतो चांदण्यात..

दिवसभर राहून घरात..

वाचन करून मोबाईलमध्ये..

विचार आला सहज मनात..

रचिती मित्र..

कोणी कविता..

कोणी गाती ते गीत स्वरात.. 

लिहितो कोणी लेख वा पत्रे..

निर्मिती सुकाव्ये..

येईल जसे ध्यानात..


वाटले मग, का राहावे मागे आपण, जर प्रतिभा असेल आपणात..

लिहून टाकावी एक कविता.. कोरोनावर..

विचार आला असा मनात…

मग काय

घेतला पेन हातात..

जो होता पडून गेली कित्येक दिवस.. भिंतीवरील शर्टाच्या खिशात..

सोबत मागविला..

एक कागद कोरा..

मुलाकडून..

होता जो त्याच्या बंद शाळेच्या बंद दप्तरात..


सुरु जहाले रणकंदन शब्दांचे मग.. यमकांचे आणि ओव्यांचे..

दाटले काहुर माझे मनात..

शब्द जोडता जुळविता कळले नाही

कधी आलो निद्रादेवीच्या गावात

रममाण होतो स्वप्नात..

आला बायकोचा मधूर (?) स्वर कानात..

उठा नाथा निद्रा पुरे आता..

झाली सुमंगल प्रभात.. 

वाट पाहती तुमची झाडू घरात आणि भांडी अंगणात..


कामे मार्गी लावून सारी बसलो होतो थाटात..

खुर्चीमध्ये दारात..

मोबाईल हातात..

हेडफोन कानात..

घोट घेत घेत चहाचा..

ऐकत होतो सुमधुर संगीत.. गुणगुणत लयीत..

आणि मग परत आला..

कविता करायचा विचार..

माझ्या मनात..


सुचले शब्द..

पण न आले ओठांवर..

पाहून-ऐकून विचार भयात..

प्रपंच शब्दांचा सुरू केला.. ऑनलाइन मोबाईलवर..

भरात..

थैमान आहे सुरू महामारीचे..

व्यापले साऱ्या जगात..

थांबा तुम्हीच घरात..

संकट आहे तुमच्या दारात..


अफवांनाही पाय फुटले बघा.. कोरोनासारखे सतराशे साठ..

नका लक्ष देऊ अशा अफवांवर.. तुम्ही हयात..

करू आपण सारे या विघ्नावर मात..

जिंकू आपण युद्ध हे नक्कीच... 

ठेवूनी अंतर आपसात…

झाकोळपट्टी बांधा नाका-तोंडावर.. 

अन् ठेवा स्वच्छ तुमचे..नियमित दोन्ही हात..

जातील दिवस हे दुःखाचे..

येतील परत क्षण..

राहा तुम्ही सुखात..


Rate this content
Log in